२४२) माझी निवृत्ती ?

12-6-2013

 

 

२४२) माझी निवृत्ती ?

मित्रानो मला कल्पना आहे कि हे शीर्षक वाचून तुमच्या मनातील पहिला विचार असेल कि  मी फेसबुकपासून निवृत्ती घेणार आहे का?  खरेतर निवृत्ती ह्या  शब्दाचा नेहमीच संकुचित अर्थ लावला जातो. निवृत्तीचा अर्थ नोकरी – व्यवसायातून निवृत्ती असाच बरेच वेळा घेतला जातो.  आपण रोजच – प्रत्येक क्षणी  निवृत्ती घेतही असतो आणि परत तीच गोष्ट करतही असतो. बघा विचार करून. असो

निवृत्तीहि अनेक प्रकारची असते. उ. हा. नोकरी -व्यवसायातून, जबाबदारीतून, मोहापासून, राग -लोभ – मत्सर – स्पर्धा-तुलना  अश्या अनेक विकारापासून, अतिरिक्त सुखापासून, दु:खापासून, सून आल्यानंतर सासू घरकामातून निवृत्ती घेण्याचा प्रयत्न करते, जगातून (मरण ) वगैरे …………असो. थोडे मुद्दे तुमच्यासाठी सोडतो.



मी आजपर्यंत कोण – कोणत्या प्रकारची निवृत्ती घेतली त्याचा  लेखा-जोखा  ह्या लेखात मांडायचा प्रयत्न करत आहे .

शिक्षणातून निवृत्ती:

मी अनेक पदव्या मिळविल्या. लोकांच्या भाषेत उज्ज्वल शैक्षणिक यश मिळविले. Medical, Astrology चा हि छंद म्हणून अभ्यास केला व करत आहे. आयुष्यभर विद्यार्थी राहण्यात काय मजा असते ते मी अनुभवत आहे. त्यामुळे मी अजूनही अभ्यास ह्या क्षेत्रातून निवृत्ती स्वीकारलेली नाही .

नोकरीतून निवृत्ती:

जानेवारी १९७५ साली मी CA परीक्षा पास झालो. CA च्या दोन्ही परीक्षेत मला Rank मिळाली.  ३१ मे १९७५ ला मला पहिल्या नोकरीचे appointment letter मिळाले . १४ -०६ -१९७५ रोजी मी नोकरीत रुजू झालो. १४ जून १९७१ ते १३ जून १९७५ पर्यंत माझा CA Training चा कालवधी होता.  त्यानंतर मी दोनदा नोकरी बदलली. तिसऱ्या  नोकरीतून मी ३१ मे १९८५ राजी राजीनामा देऊन  बाहेर पडलो. जवळ जवळ १० वर्षे मी उच्च पदावर काम केले, त्यापैकी शेवटची पाच वर्षे मी Financial Controller म्हणून जबाबदारी पार पाडली.

व्यवसायातून निवृत्ती:

१ जून १९८५  मी पासूनCA Profession म्हणून काम सुरु केले . व्यवसायात वेगळ्या वाटा निवडल्या.

Audit , Management  Consultancy  बरोबर Company formation, Company Secretarial Work, Insurance Surveyor, Insurance Investigator, Examiner of ICAI, ICSI, ICWA, IIB, Paper setter of IBPS,  Faculty Member in Staff Training Centre,  Writing many books on Audit,  Inspection, Training, Project Appraisal, Management, Investment , Medical,  Marriage, Astrology, Life Philosophy, Poems etc. , looking after Client’s business in his absence etc.

३१-१२-२००० पासून व्यवसायातून टप्याटप्याने निवृत्ती घेत गेलो व ३०-०४ -२०११ ला व्यवसायातून संपूर्ण निवृत्ती घेतली.  (नोकरी आणि व्यवसायाचा कालावधी ४० वर्षे) नोकरीत आणि व्यवसायात गुरु-शिष्य परंपरा  जपली.  एकाच वेळेला मी माझ्या सहकाऱ्यांचा  गुरु व त्याच वेळी त्यांचा शिष्य झालो. सर्वाना Equality Complex चा गुरु मंत्र दिला.

छंद:

१९९७ साली पर्यायी वैद्यक शाखेचा अभ्यास केला व १९९८ पासून नियमितपणे सहनिवासातील लोकांचे  BP  & Pathological Reports  तपासू लागलो.  आजारी माणसाला वैद्यकीय सल्ला व  धीर देऊ लागलो. म्हाताऱ्या लोकांसाठी वेळ काढू लागलो. बरेच ज्येष्ठ नागरिक माझ्याकडे येऊन मन मोकळे करतात. नाहीतरी त्यांचे ऐकायला घराच्या मंडळीना वेळ कोठे असतो? हे व्रत आजतागायत चालू आहे.

१९८७ साली ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला. आजहि अभ्यास चालू आहे. माझ्या आयुष्यातील प्रश्नांची उत्तरे शोधली. (माझ्या लहानपणी कोणताही ज्योतिषी ह्या प्रश्नांवर उजेड पाडू शकला नव्हता. )  सध्या वैद्यकीय ज्योतिष शास्त्राचा अभ्यास चालू आहे.

Photography चे वेड लहानपणापासून होते. त्या छंदात भरच पडत गेली. हजारो फोटो व video  काढले व Computer वर Save  केले. तसेच मित्रांबरोबर Share केले.

CA चा व्यवसाय करत असताना, छंद जोपासून Counselling चे काम हि करत होतो. लोकांच्या  छोट्या , मोठ्या  कौटुंबिक Problem चा गुंता सोडवत होतो. आजही हे काम गेल्या कित्येक वर्षापासून चालू आहे.  वेळात वेळ काढून Society Audits   केवळ समाजसेवेच्या भावनेतून केली. Examiner चे काम सुद्धा केवळ  समाजसेवा म्हणूनच केले. माझी समाज सेवा ह्या लेखाची लिंक: घेतलेले उच्च शिक्षण, नोकरीतील / व्यवसायातील अनुभव, आयुष्यात जोपासलेले छंद (Medical, Photography, Astrology, Graphology , interpretation of body language,  writing books etc.) याचा फायदा इतरांना व्हावा म्हणून २३ मे २००८ मध्ये मी website  www.spandane.com host केली. आजपर्यंत दीड लाखापेक्षा जास्त लोकांनी website ला भेट दिली आहे. website  ला आजपर्यंत १२ ,०० ,००० हून जास्त Hit झाल्या आहेत. ह्या सर्व Hobbies साठी भरपूर पैसा खर्च केला आहे. मी लिहिलेली अनेक पुस्तके ह्या संकेत स्थळावर अपलोड केली आहेत .

संसारातून निवृत्ती:

१९९६ सालापासून (वयाच्या ४५  वर्षापासून ) संसारात राहून वानप्रस्थाश्रम  स्वीकारला. सर्व समारंभांना जायचे बंद केले. ती जबाबदारी माझी बायको सांभाळते.

विकारांपासून निवृत्ती:

रागावर मी बऱ्यापैकी नियंत्रण मिळविले आहे . रागाचे व्यवस्थापन ह्या विषयावरील माझे विचार संकलित केले आहेत. लोभीपणा, तुलना, स्पर्धा माझ्या रक्तातच नाही, त्याबद्दल माझ्या आई-वडिलांचे आभार. मी फक्त स्वत:शी तुलना – स्पर्धा करतो. आयुष्यात जे मिळाले आहे त्यावर मी प्रथम प्रेम करतो. त्यानंतर जे हवे त्यासाठी प्रयत्न करतो. कर्म- कांडाच्या मी कधी आहारी गेलो नाही. आयुष्यात जे मिळाले आहे त्याबद्दल देवाचे आभार मानतो.  कोणतीही इच्छा मनात न ठेवता देवाचे स्मरण करतो,  कारण मागितलेली प्रत्येक गोष्ट देव देत नाही असे माझे मत आहे. मी देवाकडे दु:ख भोगायला बळ मागतो. अनावश्यक सुख नाकारतो, त्यामुळे सुखाबरोबर येणारे दु:ख आपोआप कमी होते व आयुष्यात कमी ताण -तणाव जाणवतो. फेसबुकपासून मी नियमितपणे वारंवार निवृत्ती घेत असतो.

जगातून निवृत्ती:

वडील फार थोड्या वर्षांचे सोबती आहेत हे लहानपणी कळल्यानंतर त्यांच्या मृत्युच्या छायेत मी मोठा झालो. मृत्युची भीती त्यांच्या डोळ्यात दिसत असे. मुलाबाळांची काळजी सुद्धा डोकावत असे. मला बालपण होते का?

माझ्या वडिलांना निवृत्तीपूर्वी २ महिने (वयाच्या ५८ व्या वर्षी) मृत्यूने गाठले होते. त्यावेळी मी १८ वर्षांचा होतो. (१९६९) त्यावेळेपासून मला ६० वर्षे आयुष्य आहे असे कल्पून मी आयुष्याची आखणी केली.  मी रोज देवाकडे प्रार्थना करत असे कि मला ६० व्या वर्षी मृत्यू येउदे म्हणजे वडिलांसारखी निराशा पदरी येणार नाही. ६० वर्षात मी सर्व काही करून घेईन.  ( शिक्षण, नोकरी, व्यवसाय, संसार, hobbies , प्रवास, second home, समाज सेवा वगैरे) १९९६ साली एका भीषण अपघातातून वाचलो आणि मला प्रकर्षाने लहानपणच्या इच्छेची आठवण झाली.  माझ्याकडे फक्त १५ वर्षे होती.

अपघातातून वाचलो आणि गाव मला खुणाऊ लागले. १९९७ साली Second Home  चा ताबा घेतला व दर महिन्याला ४ दिवस गावी जाऊ लागलो. निसर्ग माझा लहानपणापासूनचा जिवलग मित्र आहे .

थोडक्यात म्हणजे ठरवल्याप्रमाणे सर्व गोष्टी ६० वर्षात पूर्ण केल्या. नातवंडांसाठी ४०० पानाचे आत्मचरित्र लिहून ठेवले. (त्यांना जर मोठे झाल्यावर आजोबाला जाणून घ्यावे असे वाटले तर मीच ती सोय करून ठेवली. )

१५-०५-२०११ ला ६० वर्षे पूर्ण झाली. दिवस एकांतात घालवायचे ठरवले. पण माझ्या मुलाने आणि सुनेने तसे होऊ दिले नाही. माझा वाढदिवस घरच्या घरी पण दणक्यात साजरा केला. मुलगी नातवाना घेऊन संध्याकाळी  आली व परत एकदा Cake कापून वाढदिवस साजरा झाला. मला १६-०५-२०११ ची प्रतीक्षा होती. देव माझी लहानपणापासूनची विनंती मान्य करतो का? पण नाही. तसे झाले नाही. देवाने माझी विनंती मान्य केली नाही आणि आज मी हा लेख लिहित आहे.

जिवंत असताना मी अनेक मृत्यू बघितले. त्यातील काही मृत्यूनी माझ्या मनात घर केले. त्या आठवणींचा मागोवा एक लेखात घेतला आहे . लिंक: स्वत:हि मृत्यूचे दर्शन करून आलो आहे. त्या आठवणी जाग्या झाल्या तरी आजही मन अस्वस्थ होते . लिंक: शेवट माझ्या ‘ निवृत्ती ‘ ह्या कवितेने करतो .

निवृत्ती

निवृत्ती म्हणजे निवृत्ती असते.

प्रत्येकाची वेगळी असते.

निवृत्ती मनाची असते.

निवृत्ती जबाबदारीची असते.

निवृत्ती कर्तव्यपूर्तीची असते.

निवृत्ती विकारांची असते.

आज मी उभा आहे निवृत्ती घेऊन उंबरठ्यावर.

काय कमावलं, काय गमावलंचा हिशेब मांडत कॉम्पुटरवर.

निवृत्ती हि निवृत्ती असते व्यवसायातून / नोकरीतून, सेवेसाठी.

आयुष्यभर जे समाजाने दिले ते भरभरून परत देण्यासाठी.

जन्म आणि मरणामध्ये एका श्वासाचे अंतर आहे …..

चांगल्या कामाचा मला ध्यास आहे आणि हाच माझा श्वास आहे.

मरण हे मरण असते ………..

प्रत्येकाचे वेगळे असते.

माणूस रोजच मरतो मनाने.

यमाने नेल्यानंतर एकदाच मरतो शरीराने.

निवृत्ती म्हणजे निवृत्ती असते.

प्रत्येकाची वेगळी असते.


Horoscopes for your website

Horoscopes with scores


How lucky are you today:

Add this to your website

Detailed horoscopes